B. K. Misra : रुग्णांना नवे जीवन देणारे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. बी. के. मिश्रा

171
B. K. Misra : रुग्णांना नवे जीवन देणारे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. बी. के. मिश्रा
B. K. Misra : रुग्णांना नवे जीवन देणारे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. बी. के. मिश्रा

डॉक्टरांना लोक देवाचा अवतार मानतात. कारण लोकांनी खूप वर्षे जगावं, निरोगी राहावं यासाठी ते प्रयत्न करत असतात. मरणाला टेकलेल्या अनेक रुग्णांना या डॉक्टरांनी नवे जीवन दिले आहे. त्यापैकी एक म्हणजे डॉ. बी. के. मिश्रा म्हणजेच डॉ. बसंत कुमार मिश्रा… ते मेंदू, मणका, सेरेब्रोव्हॅस्क्युलर आणि पेरिफेरल मज्जासंस्थेचे विकार, दुखापत, पॅथॉलॉजीस आणि विकृतींवर उपचार करणारे प्रख्यात न्यूरोसर्जन आहेत.

(हेही वाचा – Maratha Reservation : जरांगे पाटलांना छत्रपतींच्या मावळ्याचे खडे बोल, म्हणाले, राम मंदिराच्या आनंदावर आंदोलनाचे विरजण नको!)

न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष

मिश्रा हे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोसर्जिकल सोसायटीजचे (World Federation of Neurosurgical Societies) उपाध्यक्ष आणि एशियन ऑस्ट्रेलियन सोसायटी ऑफ न्यूरोलॉजिकल सर्जन आणि न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (Asian Australian Society of Neurological Surgeons and Neurological Society of India) माजी अध्यक्ष आहेत. मिश्रा यांचा जन्म १८ जानेवारी १९५३ रोजी भुवनेश्वर येथे झाला. त्यांचे वडील डॉ. बैद्यनाथ मिश्रा हे प्रख्यात अर्थतज्ञ होते.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमधून डीएनबी न्यूरोसर्जरीचे शिक्षण

त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले तसेच दिल्ली युव्हर्सिटीमधून एमएस जनरल सर्जरीचे शिक्षण घेतले. AIIMS येथून त्यांनी न्यूरोसर्जरीमध्ये MCh पूर्ण केले आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमधून (National Board of Examination) डीएनबी न्यूरोसर्जरीचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांना एडिनबर्ग विद्यापीठाची वैद्यकीय शिष्यवृत्ती देखील मिळाली होती.

(हेही वाचा – Ayodhya Rammandir : कारुळकर प्रतिष्ठानने राममंदिराची प्रतिकृती पाठवली अमेरिकेला; स्वागतासाठी होणार पूजा-पाठ)

डॉ. बी.सी. रॉय पुरस्काराचे प्राप्तकर्ता

ते भारतातील सर्वोच्च वैद्यकीय सन्मान डॉ. बी.सी. रॉय पुरस्काराचे (Dr. B.C. Roy Award) प्राप्तकर्ता आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये २०० हून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांची वैद्यकीय कारकीर्द यशस्वी राहिली आहे आणि अनेकांना त्यांनी जीवनदान दिले आहे. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना डॉ. बी. सी. रॉय हा सर्वोच्च वैद्यकीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.